बहिणीची माया : बहिण हे देवाने दिलेले एक वरदान आहे. ज्याच्याकडे बहिण आहे तो जगातील नशीबवान व सुखी मनुष्य. बहिण ही भावाची दुसरी आईच असते. बहिणीची माया ही निःस्वार्थ, प्रेमळ आणि आधारभूत असते. बहिण म्हणजे केवळ रक्ताचे नाते नसून, ती आयुष्यभराची सोबती, सखी आणि संकटात साथ देणारी असते. लहानपणीच्या भांडणांपासून मोठेपणीच्या जबाबदाऱ्यांपर्यंत बहिणीचे नाते हळुवारपणे फुलत जाते.
बहिणीच्या प्रेमामध्ये खालील बाबी आढळतात
- संवेदनशीलता: बहिण आपल्या भावंडांची मानसिक मनःस्थिती पटकन ओळखते. भावंडाचे सुख - दु:ख कशात आहे ती जाणते.त्याप्रमाणे भावंडासोबत वर्तणूक करून त्यांच्याविषयी संवेदनशील असते.
- समजूतदारपणा: अडचणीच्या वेळी बहिण आपल्या भावंडाना चांगला सल्ला देते. भावंड जर त्दियांच मत मांडत असतील तर ते एकूण घेऊन त्यांना असा सल्ला देते कि, तो सल्ला हृदयाला स्पर्श करणारा असतो.
- त्याग: बहिण स्वत: उपाशी राहून भावडांना जेऊ घालते.तिला स्वत: च्या आनंदापेक्षा भावंडांचे सुख तिला जास्त प्रिय असते.भावडांसाठी ति सर्व सुखाचा त्याग करते.बहिणीकडे त्यागवृत्ती जास्त असते.
- राग आणि प्रेम: बहिण भावाचे भांडण नेहमी होते, पण काही वेळातच तिचे प्रेम पुन्हा ओसंडून वाहू लागते.सर्वांना रागावते पण तेवढेचे प्रेम ति सर्वावर करते. रागापेक्षा तिचे सर्वांवर प्रेम जास्त असते.
- "बहिणीशिवाय घर सुने-सुने वाटते" असे अनेक कवी आणि लेखकांनी आपल्या साहित्यामध्ये व्यक्त केले आहे.
बहिण – प्रेम, माया आणि आधाराचा गोड धागा
बहिण हे नुसते नाते नाही, तर ती एक भावना आहे, एक सुरक्षा कवच आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे केवळ रक्ताचे नाही तर मैत्री, आपुलकी आणि कायमच्या सोबतीचे असते. बालपणात लहानसहान भांडणांपासून मोठेपणीच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंत हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते.
बहिणीचे महत्व:
- आईसारखी माया: आईप्रमाणे ती आपल्या भावंडांची काळजी घेते, त्यांची सुखदुःख जाणते.
- गुपितांची साथीदार: आपल्या भावंडांचे सर्वात मोठे गुपित तीच जपते.
- संकटातील आधार: कुठल्याही कठीण परिस्थितीत ती नेहमी सोबत उभी असते.
- विचारशील मार्गदर्शक: ती आपल्याला योग्य तो सल्ला देते, चुका सुधारायला मदत करते.
- आयुष्यभराची मैत्रीण: वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्येही तिचे प्रेम कायम टिकून राहते.
भावनांची अभिव्यक्ती
✨ बहिण म्हणजे सावली गोड, संकटात ती साथ देई ठाम,
✨ आईसारखी मायाळू हसरी, तिच्या प्रेमाचा नाही काटकसर थोडा!



