Monday, February 3, 2025

पती : सुख दु:खाचा साथीदार

 पती  : सुख दु:खाचा साथीदार   

         सुख दु:खात जीवनभर जो सोबत असतो, असा जीवनसाथी की,आपल्या साथीदाराच्या मनातील भावनांना न सांगता समजतो.पत्नीची प्रत्येक इच्छा ,आकांक्ष पूर्ण करून पत्नीने पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो.पत्नीचा आदर करून तिला आधार देतो.खरं प्रेम फक्त गोड शब्दांमध्ये नसतं, तर रोजच्या छोट्या गोष्टींमधून ते जाणवतं—पत्नीच्या  आरोग्याची काळजी घेणं, पत्नीच्या  स्वप्नांना पाठिंबा देणं, पत्नीसोबत वेळ  घालवणं आणि पत्नीच्या  भावना समजून घेणं. 

       पती हा कृतीशील प्राणी आहे.पतीचे प्रेम हे त्याच्या वागण्यातून व कृतीतून प्रकट होते.ते फक्त शब्दात नव्हे पतीने पत्नीच्या लहान सहान  गोष्टींच्या घेतलेल्या काळजीतून जाणवते.


पतीच्या प्रेमाचा प्रत्यय देणाऱ्या काही बाबी 

💖काळजी आणि समजूतदारपणा पती हा पत्नीच्या  भावना समजून घेतो,तिची काळजी घेतो आणि  पत्नी  सतत आनंदी राहावी  यासाठी खूप प्रयत्न करतो.पती हा पत्नीच्या आरोग्याची, आनंदाची आणि भावनांची काळजी घेतो.

💖 साथ आणि आधार पती हा नेहमी संकट प्रसंगी ,कठीण वेळी  नेहमी पत्नीसोबत  असतो, पत्निला   मानसिक आणि भावनिक आधार देतो. पत्नीसाठी पती आधारवड असतो. पत्नी  दु:खी असेल  किंवा तणावात असेल, तेव्हा तो पत्नीला  समजून घेतो आणि सांत्वन देतो. कितीही कठीण प्रसंग असले तरी पत्नीला  सोडून जात नाही, पत्नीला  हात देऊन उभं करतो.
💖 आदर आणि सन्मान पती सतत पत्नीच्या  मतांचा, इच्छांचा व आकांक्षाचा  सन्मान करतो आणि त्यांना महत्त्व देतो.तसेच पत्नीच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करून तिचे प्रत्येक मत स्वीकारतो.
पती नेहमी  पत्नी सोबत  समतेने वागतो.पत्नीच्या  निर्णयांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करतो, पत्नीवर  विश्वास ठेवतो.
💖 आवडी-निवडी जपणे  पती नेहमी पत्नीच्या  आवडी-निवडी लक्षात ठेऊन त्या जपण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पत्नी ज्या कृतीमधून सुखावेल याचा विचार करून  तशा  छोट्या-मोठ्या  गोष्टी करतो.
💖पत्नीला  वेळ देणेपतीचा  कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी पत्नीसाठी वेळात वेळ काढतो तिला आनंदी ठेवतो .
💖पत्नीच्या  स्वप्नांना पाठिंबा पत्नीच्या  ध्येयांसाठी,स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठींबा देऊन हातभार लावतो. पत्नी यशस्वी होण्यासाठी तिला   प्रोत्साहन देतो. पत्नीच्या  यशाचा पती  खूप अभिमान बाळगतो आणि पत्नीला  पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.
💖 समर्पण आणि निष्ठा पती हा  पत्नीच्या  नात्याला प्राधान्य देतो आणि प्रामाणिक राहतो.पती-पत्नीचे  नातं अधिक सुंदर करण्यासाठी तो सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो.

💖 निर्मळ प्रेमकोणत्याही अपेक्षेशिवाय पत्नीला  आनंदी पाहण्याची इच्छा बाळगतो.खरं प्रेम कधीच जबरदस्तीचं नसतं.पती निर्मळ निस्वार्थी प्रेम करतो .

 पतीला जाणीव आहे कि, प्रेम फक्त मोठ्या गिफ्ट्समध्ये नसतं, तर रोजच्या संवादात, काळजीत आणि एकत्र घालवलेल्या वेळेत असतं.


पतीचे प्रेम  हे निर्मळ व निस्वार्थी आहे. 

No comments:

Post a Comment

बहिणीची माया : सुखाचे गमक

  बहिणीची माया :      बहिण हे देवाने दिलेले एक वरदान आहे. ज्याच्याकडे  बहिण  आहे तो जगातील नशीबवान व सुखी मनुष्य.  बहिण  ही भावाची दुसरी आई...