Wednesday, February 5, 2025

बहिणीची माया : सुखाचे गमक

 बहिणीची माया :     बहिण हे देवाने दिलेले एक वरदान आहे. ज्याच्याकडे बहिण आहे तो जगातील नशीबवान व सुखी मनुष्य. बहिण ही भावाची दुसरी आईच असते.  बहिणीची माया ही निःस्वार्थ, प्रेमळ आणि आधारभूत असते. बहिण म्हणजे केवळ रक्ताचे नाते नसून, ती आयुष्यभराची सोबती, सखी आणि संकटात साथ देणारी असते. लहानपणीच्या भांडणांपासून मोठेपणीच्या जबाबदाऱ्यांपर्यंत बहिणीचे नाते हळुवारपणे फुलत जाते.

बहिणीच्या प्रेमामध्ये खालील बाबी आढळतात 

  • संवेदनशीलता: बहिण  आपल्या भावंडांची मानसिक  मनःस्थिती पटकन ओळखते. भावंडाचे सुख - दु:ख कशात आहे ती जाणते.त्याप्रमाणे भावंडासोबत वर्तणूक करून त्यांच्याविषयी संवेदनशील असते.
  • समजूतदारपणा:  अडचणीच्या वेळी बहिण आपल्या भावंडाना चांगला सल्ला देते. भावंड जर त्दियांच मत मांडत असतील तर ते एकूण घेऊन त्यांना असा सल्ला देते कि, तो  सल्ला हृदयाला स्पर्श करणारा असतो.
  • त्याग: बहिण स्वत: उपाशी राहून भावडांना जेऊ घालते.तिला स्वत: च्या आनंदापेक्षा भावंडांचे सुख तिला जास्त प्रिय असते.भावडांसाठी ति सर्व सुखाचा त्याग करते.बहिणीकडे त्यागवृत्ती जास्त असते.
  • राग आणि प्रेम:  बहिण भावाचे भांडण नेहमी  होते, पण काही वेळातच तिचे प्रेम पुन्हा ओसंडून वाहू लागते.सर्वांना रागावते पण तेवढेचे प्रेम ति सर्वावर करते. रागापेक्षा तिचे सर्वांवर प्रेम जास्त असते.
  • "बहिणीशिवाय घर सुने-सुने वाटते" असे अनेक कवी आणि लेखकांनी आपल्या साहित्यामध्ये व्यक्त केले आहे.
 
"ज्या कुटुंबात बहिणीचा वास असतो ते कुटुंब जगातील सर्वात सुखी कुटुंब असते ,समाधानी कुटुंब असते.ते सर्व भावंडे जागातील नशीबवान भावंडे असतात. आई-वडील यांच्या नंतर कुटुंबाला सांभाळणारी बहिणच असते." 

बहिण – प्रेम, माया आणि आधाराचा गोड धागा

बहिण हे नुसते नाते नाही, तर ती एक भावना आहे, एक सुरक्षा कवच आहे. भाऊ-बहिणीचे नाते हे केवळ रक्ताचे नाही तर मैत्री, आपुलकी आणि कायमच्या सोबतीचे असते. बालपणात लहानसहान भांडणांपासून मोठेपणीच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंत हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते.

बहिणीचे महत्व:

  1. आईसारखी माया: आईप्रमाणे ती आपल्या भावंडांची काळजी घेते, त्यांची सुखदुःख जाणते.
  2. गुपितांची साथीदार: आपल्या भावंडांचे सर्वात मोठे गुपित तीच जपते.
  3. संकटातील आधार: कुठल्याही कठीण परिस्थितीत ती नेहमी सोबत उभी असते.
  4. विचारशील मार्गदर्शक: ती आपल्याला योग्य तो सल्ला देते, चुका सुधारायला मदत करते.
  5. आयुष्यभराची मैत्रीण: वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्येही तिचे प्रेम कायम टिकून राहते.

भावनांची अभिव्यक्ती 

✨ बहिण म्हणजे सावली गोड, संकटात ती साथ देई ठाम,
✨ आईसारखी मायाळू हसरी, तिच्या प्रेमाचा नाही काटकसर थोडा!


वेड्या बहिणीची वेडी ही माया 

Monday, February 3, 2025

पती : सुख दु:खाचा साथीदार

 पती  : सुख दु:खाचा साथीदार   

         सुख दु:खात जीवनभर जो सोबत असतो, असा जीवनसाथी की,आपल्या साथीदाराच्या मनातील भावनांना न सांगता समजतो.पत्नीची प्रत्येक इच्छा ,आकांक्ष पूर्ण करून पत्नीने पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो.पत्नीचा आदर करून तिला आधार देतो.खरं प्रेम फक्त गोड शब्दांमध्ये नसतं, तर रोजच्या छोट्या गोष्टींमधून ते जाणवतं—पत्नीच्या  आरोग्याची काळजी घेणं, पत्नीच्या  स्वप्नांना पाठिंबा देणं, पत्नीसोबत वेळ  घालवणं आणि पत्नीच्या  भावना समजून घेणं. 

       पती हा कृतीशील प्राणी आहे.पतीचे प्रेम हे त्याच्या वागण्यातून व कृतीतून प्रकट होते.ते फक्त शब्दात नव्हे पतीने पत्नीच्या लहान सहान  गोष्टींच्या घेतलेल्या काळजीतून जाणवते.


पतीच्या प्रेमाचा प्रत्यय देणाऱ्या काही बाबी 

💖काळजी आणि समजूतदारपणा पती हा पत्नीच्या  भावना समजून घेतो,तिची काळजी घेतो आणि  पत्नी  सतत आनंदी राहावी  यासाठी खूप प्रयत्न करतो.पती हा पत्नीच्या आरोग्याची, आनंदाची आणि भावनांची काळजी घेतो.

💖 साथ आणि आधार पती हा नेहमी संकट प्रसंगी ,कठीण वेळी  नेहमी पत्नीसोबत  असतो, पत्निला   मानसिक आणि भावनिक आधार देतो. पत्नीसाठी पती आधारवड असतो. पत्नी  दु:खी असेल  किंवा तणावात असेल, तेव्हा तो पत्नीला  समजून घेतो आणि सांत्वन देतो. कितीही कठीण प्रसंग असले तरी पत्नीला  सोडून जात नाही, पत्नीला  हात देऊन उभं करतो.
💖 आदर आणि सन्मान पती सतत पत्नीच्या  मतांचा, इच्छांचा व आकांक्षाचा  सन्मान करतो आणि त्यांना महत्त्व देतो.तसेच पत्नीच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करून तिचे प्रत्येक मत स्वीकारतो.
पती नेहमी  पत्नी सोबत  समतेने वागतो.पत्नीच्या  निर्णयांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करतो, पत्नीवर  विश्वास ठेवतो.
💖 आवडी-निवडी जपणे  पती नेहमी पत्नीच्या  आवडी-निवडी लक्षात ठेऊन त्या जपण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पत्नी ज्या कृतीमधून सुखावेल याचा विचार करून  तशा  छोट्या-मोठ्या  गोष्टी करतो.
💖पत्नीला  वेळ देणेपतीचा  कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी पत्नीसाठी वेळात वेळ काढतो तिला आनंदी ठेवतो .
💖पत्नीच्या  स्वप्नांना पाठिंबा पत्नीच्या  ध्येयांसाठी,स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठींबा देऊन हातभार लावतो. पत्नी यशस्वी होण्यासाठी तिला   प्रोत्साहन देतो. पत्नीच्या  यशाचा पती  खूप अभिमान बाळगतो आणि पत्नीला  पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो.
💖 समर्पण आणि निष्ठा पती हा  पत्नीच्या  नात्याला प्राधान्य देतो आणि प्रामाणिक राहतो.पती-पत्नीचे  नातं अधिक सुंदर करण्यासाठी तो सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो.

💖 निर्मळ प्रेमकोणत्याही अपेक्षेशिवाय पत्नीला  आनंदी पाहण्याची इच्छा बाळगतो.खरं प्रेम कधीच जबरदस्तीचं नसतं.पती निर्मळ निस्वार्थी प्रेम करतो .

 पतीला जाणीव आहे कि, प्रेम फक्त मोठ्या गिफ्ट्समध्ये नसतं, तर रोजच्या संवादात, काळजीत आणि एकत्र घालवलेल्या वेळेत असतं.


पतीचे प्रेम  हे निर्मळ व निस्वार्थी आहे. 

Sunday, February 2, 2025

प्रेम धर्मपत्नीचे

 प्रेम धर्मपत्नीचे  (बायको,अर्धागीनीचे)

अर्धांगिनी – जीवनसाथीचे खरे रूप ❤️

"अर्धांगिनी" हा शब्दच स्पष्ट करतो की ती केवळ पत्नी नसून नवऱ्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. ती फक्त संसाराची जोडीदार नाही, तर त्याचा प्रत्येक सुख-दुःखातील आधारस्तंभ आहे.

Saturday, February 1, 2025

वडिलांचे प्रेम : पोलादी ढाल

 वडिलांचे प्रेम : पोलादी ढाल


  वडिलांचे प्रेम हे निस्वार्थ, संरक्षक आणि मार्गदर्शक असते. ते शब्दांपेक्षा कृतींमध्ये अधिक दिसून येते. लहानपणी हात धरून चालवणारे, संकटात आधार देणारे आणि जीवनभर प्रेरणा देणारे वडील हे खऱ्या अर्थाने निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक असतात.

वडिलांच्या प्रेमाची काही सुंदर रूपे:

त्याग: स्वतःच्या इच्छा, गरजा बाजूला ठेवून मुलांसाठी मेहनत करणे.

हेच तर प्रेम ...

 प्रेम आहे तरी काय ?

  • दिवस-रात्र कोणाशी फक्त बोलत  राहणं प्रेम नाही.

बहिणीची माया : सुखाचे गमक

  बहिणीची माया :      बहिण हे देवाने दिलेले एक वरदान आहे. ज्याच्याकडे  बहिण  आहे तो जगातील नशीबवान व सुखी मनुष्य.  बहिण  ही भावाची दुसरी आई...